Back to Top
श्री शिवलीलामृत (Shiva Lilamruta) MP3 Screenshot 0
श्री शिवलीलामृत (Shiva Lilamruta) MP3 Screenshot 1
श्री शिवलीलामृत (Shiva Lilamruta) MP3 Screenshot 2
Free website generator for mobile apps; privacy policy, app-ads.txt support and more... AppPage.net

About श्री शिवलीलामृत (Shiva Lilamruta) MP3

श्रीशिवलीलामृत हा चौदा अध्यायांचा, २४५३ ओव्यांचा ग्रंथ स्कंदपुराणातिल ब्राम्होत्तर खंडाच्या आधारे रचला आहे. हा ओवीबद्ध ग्रंथ प्रसिद्ध संतकवी श्री प.प श्रीधरस्वामी यांनी इ. स. १७१८ मध्ये बारामती (महाराष्ट्र) येथे रचला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्रीधर नारायणशास्त्री नाझरेकर असे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील नाझरे या गावी इ. स. १६५८ साली झाला. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते पंढरपुरातच स्तायिक झाले होते. तेथे राहून पुराण-प्रवचने व कीर्तने करून भक्तिमार्गाचा प्रसार करू लागले. त्यांची रसाळ कीर्तने ऐकण्यासाठी लोकांची गर्दी लोटू लागली. साहजिकच जे आपण कीर्तन-प्रवचनातून सांगतो, ते ग्रंथबद्ध केल्यास भाविक जनांना त्याचा अधिक लाभ होईल, असा विचार करून त्यांनी पुराणकथा मराठी भाषेत ओविछन्दात लिहिण्यास प्रारंभ केला. त्यांचा पहिला ओवीबद्द ग्रंथ 'हरिविजय' हा होय. आकाराने लहान असलेला श्रीशिवलीलामृत हा त्यांचा शेवटचा सहावा ग्रंथ होय.

श्रीधरस्वामी भगवदभक्त संत होते. त्यांची भाषा संस्कृतप्रचुर असली, तरी साधी व प्रासादिक आहे. त्यांची वर्णनशैली ओघवती, चित्रदर्शी असल्याने वाचकांचे चित्त ग्रंथातील विषयात गुंतवून ठेवते. त्यांच्या काव्यात भक्तिरस प्रधान असून त्याचा परिपोष करणारे वीर-करुनादी रस हि प्रभावशाली आहेत. त्याचबरोबर धर्मशास्त्र, अध्यात्म, सांख्य इत्यादी शास्त्रांची ओळखही ते वाचकांना करून देतात.

अशा या प्रासादिक ग्रंथाचे हे वाचन आहे.

Similar Apps

विठू माऊली (Vithu Mauli)

विठू माऊली (Vithu Mauli)

0.0

विठू माऊली अँड्रॉइड अँप मध्ये विठ्ठल, पंढरपूर, विठ्ठल अभंग, संत परमपारा (संस्कृती),...

Gurucharitra | गुरुचरित्र

Gurucharitra | गुरुचरित्र

0.0

श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा अतिशय प्रासादिक असा...

Eknathi Bhagwat एकनाथी भागवत

Eknathi Bhagwat एकनाथी भागवत

0.0

एकनाथी भागवत हा नाथांचा अत्यंत महत्त्वाचा, सर्वांगसुंदर आणि लोकप्रिय असा ग्रंथ आहे....

Bhagvad Gita Hindi

Bhagvad Gita Hindi

0.0

Bhagavad Gita is knowledge of five basic truths and the relationship of...

संत तुकाराम गाथा Sant Tukaram

संत तुकाराम गाथा Sant Tukaram

0.0

संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते....

Shrimad Bhagwat Geeta MP3 (श्र

Shrimad Bhagwat Geeta MP3 (श्र

0.0

श्रीमद् भागवत गीता भावार्थ मराठी MP3 मध्ये....

author
Best app
suvarna shevare
author
Jay bhole nath
Deepak Tandon
author
Best
saudagar kumbhar
author
good work
Amit Tamkar
author
Good
भाऊसाहेब नांगरेपाटील
author
Best app.
Gokuldas Ganage