Kamlesh Ajgaonkar
- Flag inappropriate
- Show review history
कल्पना चांगली आहे. परंतु 28 व 29 च्या पाढ्यांमध्ये संख्या २००च्या गेल्यावर पुढे उच्चारात चुका झालेल्या आहेत. (28x8, 28x9, 29x7, 29x8, 29x9) त्या सुधारल्या नाहीत तर चुकीचे पाठांतर होईल. मी सर्व पाढे ऐकले नाहीत. कोणीतरी ते तपासणे आवश्यक आहे. २८x८= चोविसाशे नव्हे चोवीसदोन २८x९= बावनदोन २९x७= तीहेदोन २९x८= बत्तीसाशे नव्हे बत्तीस दोन २९x९= एकसष्टदोन ३०x७= दाहोसे नव्हे दाहेदोन. मला आढळून आलेल्या पैकी या वरील सुधारणा करणे आवश्यक आहे.
13 people found this review helpful
Hira Studio
April 10, 2021
नमस्कार कमलेशजी,
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही लहानपणी जसे शिकलो होतो तसे केले आहे, तुम्ही आम्हाला सुधारणा करण्यात मदत केली तर चांगले होईल. कृपया आम्हाला मेल करून सुधारणा सांगा, आपल्या सूचनेप्रमाणे अँप मध्ये लवकरच बदल केला जाईल.
आपल्याला जर आमचे काम आवडले असेल तर कृपया ५ स्टार देऊन आम्हाला प्रोत्साहीत करावे.
धन्यवाद!